breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयानं राखून ठेवली; दिली उद्याची तारीख

मुंबई |

संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे सुरू असलेली नितेश राणे यांच्या अर्जावरील अटकपूर्व जामीन याची सुनावणी पूर्ण झाली. मात्र, कोर्टाने यावर सुनावणी आज करण्यास नकार दिल्याने याची सुनावणी उद्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. उद्या गुरुवारी वेळ मिळाल्यावर या सुनावणीवर निर्णय घेतला जाईल, असे यावेळी कोर्टाने सांगितले. ज्यांच्यावर हल्ला झाला ते संतोष परब कोर्टातून बाहेर पडताना माध्यमांसमोर आले मात्र त्यांनी बोलण्यास पूर्णपणे नकार दिला.

दरम्यान, नितेश राणेंच्या नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारल्यावर हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर नारायण राणेंनी दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. यानंतर पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार असली तरी नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

  • वकील काय म्हणाले?

धीरज जाधव,ज्ञानेश्वर माऊली आणि सचिन सातपुते हे तिघे या प्रकरणात आरोपी आहेत. या तिघांचा नितेश राणे आणि सचिन सावंत यांच्याशी संबंध आहे. या आरोपींचा नितेश राणेंशी संबंध असल्याचे तांत्रिक पुरावे असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय. आरोपी सचिन सातपुते याला नितेश राणेंच्या पीएकडून सातत्याने फोन करण्यात आले, असंही सरकारी वकील म्हणाले. तर, नितेश राणेंना अटक नाही केली तर मोर्चा काढू असं शिवसेनेचे आमदार म्हणत आहेत, सत्तेत असणारेच जर मोर्चा काढत असतील, तर मग पोलिसांवर दबाव कोण टाकतंय, असा सवाल नितेश राणेंच्या वकिलांनी केला. तसेच नितेश राणेंच्या पीएकडून आरोपी सचिन सातपुतेला फोन केल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं ते म्हणाले.

  • नेमकं प्रकरण काय?

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेण्यात आलं असल्याची माहिती आहे. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. दरम्यान संतोष परब शिवसैनिक असल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.

“मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button