breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना प्रादुर्भाव, साडेआठ हजार घरासह सातशे प्रवाशांची तपासणी

पुणे |महाईन्यूज|

पुणे शहरात बाधित भागातील चार ठिकाणे निश्चित केली असून, तेथे शुक्रवारपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणांतर्गत आठ हजार ७७७ घरांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, ३ हजार ८७ जणांची तपासणी झाली आहे. पैकी दोघांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांना तपासणीसाठी नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. १२ मार्चपर्यंत ३११ प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत ७०० प्रवाशांची तपासणी झाली आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपनिवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

२३३ जणांच्या चाचणीचे नमुने ‘एनआय़व्ही’ला पाठविण्यात आले होते. पैकी २२४ जणांची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली असून ९ जणांचे नमुने प्रलंबित आहेत. अमेरिकेतून प्रवास करून आलेल्या आणखी २२ वर्षाच्या तरुणाला शुक्रवारी लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०वर पोहोचली आहे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार पाचशे खाटांची क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार पुण्यात ३७० खाटा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १४० अशा ५१० खाटांची सुविधा तयार केली आहे. गुरुवारी दुबईतून आलेल्या विमानातील एकाही प्रवासाला लक्षणे आढळली नाहीत. दुबईहून मुलासह आलेल्या महिलेला थोडी लक्षणे दिसत असल्याने ती स्वतःहून नायडू रुग्णालयात आली. तिच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. ही महिला सांगलीची असून, ती मुंबईत उतरली होती. ती स्वतःहून नायडू रुग्णालयात आल्याने तिची तपासणी करण्यात आल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button