breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यात नामर्दांचं सरकार’; संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारव जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, राज्यातील सामान्य माणूस संकटात आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक पर्यटन सुरु आहे. राज्यातील सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग आहेत. इकडून तिकडे खोके पोहोचवणं हेत या सुलतानांचं काम आहे.

हेही वाचा  –  ‘..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा’; राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी 

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतायेत. नाशकापासून नंदुरबारपर्यंत अशीच स्थिती आहे. द्राक्ष गेली आहे. कापूस, फळबागा गेल्या आहेत. पण राज्यातील सरकार कुठंय? आसमानी संकट कोसळत असताना हे सुलतान प्रचारात दंग आहेत. छत्तीसगढ, हैदराबाद, जयपूर, निवडणूक पर्यटन सुरू आहे. आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर हे लोकांच्या भेटी घेत आहेत. आमचे नेते मात्र अगोदरपासून दौरा करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

दत्ता दळवी तुरुंगात आहेत.. दोन-चार लोक आले. त्यांनी दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या. ही त्यांची मर्दानगी.. भाड्यानं माणसं घेतात..दत्ता दळवी बाहेर येतील. जर खरा मर्द असेल तर गाडी फोडून तिथंच थांबा. पळून का जाता थांबा ना तिथं..राज्यात नामर्दांचं सरकार आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button