breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये मोदींची जादू चालणार नाही’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकां सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये मोदींची जादू चालणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशइतके स्वच्छ झालं आहे. तसेच, मिझोरामध्ये प्रादेशिक नॅशनल फ्रंट आणि अन्य पक्षांत लढाई आहे. या लढाईत काँग्रेसचं अस्तित्व आहे. पण, मिझोराममध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा विजय होणार नाही.

तेलंगणात भाजपा स्पर्धेत नाही. भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून के. चंद्रशेखर राव आणि एमआयएमला मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश दिला आहे. पण, काँग्रेसला मतदान करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. तेलंगणात भाजपाने ही रणनिती आखली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसने मुसंडी मारली असून चांगला निकाल समोर येऊ शकतो.

हेही वाचा  –  पूर्णानगरमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव होत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत ‘जादूगर’ आहेत. गेहलोतांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. पाच वर्षानंतर राजस्थानात एखादं सरकार पुन्हा येत नाही. तिथे अटीतटीची लढाई आहे. तरीही राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींनी पाच राज्यांमध्ये रान पेटवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपा विकासाच्या कामावर मते का मागत नाही? प्रभू श्री रामाचे दर्शन मोफत दाखवण्यापेक्षा काश्मीरी पंडितांची घरवापसी केली असती, तर नक्कीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागण्याचा अधिकार भाजपाला होता. २०१४ पासून काश्मीरी पंडितांच्या मुद्दयावरून भाजपा मते मागत आहे. पण, पुलवामात ४० जवानांची हत्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button