breaking-newsपिंपरी / चिंचवड
फ्लॅट देण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यवसायकाला 48 लाखांचा गंडा
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – विट व्यावसायिकाला फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून बिल्डरने तब्बल ४७ लाख ८० हजार रूपयांना गंडा घातला. ही घटना मामुर्डी येथे घडली.
सुरेश पुंडलीक शिरूडे असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे. याप्रकरणी महेश शिवाजी राऊत (वय ३०, रा. पाटील वस्ती, मामुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांचा विट कारखाना आहे. तर, आरोपी शिरूडे हे बिल्डर असून भुमी क्रिएशन या नावाने त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. शिरूडे यांनी विट व्यवसायातून राऊत यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या भुमी ओराबेल या नवीन प्रकल्पात राऊत यांना फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी त्यांच्याकडून ४७ लाख ८० हजार रूपये घेतले. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही फ्लॅट न देता राऊत यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.