ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

सनी दाचा ‘मॉली’त जीव रंगला…दोस्तीचं प्रेमं झालं आता लग्नाचं प्रेम

मुंबई | महाईन्यूज |

झी मराठी वाहिनीवरील कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेतील राणा दा आणि अंजली बाईंच्या जोडीला अख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण मालिकेतला राणा दाचा लहान भाऊ सनी दाचंही तेवढच क्रेझ पहायला मिळालं. हा सनी दा म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

राज हा मुळचा कोल्हापुरचा असला तरी त्याचा जीव मात्र एका हरियाणाच्या मुलीवर जडला… आता या दोघांनी लग्न केलं आहे. मनीषा उर्फ मॉली डेस्वाल हिच्यासोबत राजचा विवाह झाला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्या सुंदर फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सेलिब्रिटींनी य़ा जोडप्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. हे कपल खऱ्या अर्थाने ‘कपल गोल्स’ आहेत असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलंय. राज आणि मॉली एकमेकांना गेल्या सहा वर्षापासून ओळखत आहेत. राज आणि मॉलीचं लव्हमॅरेज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button