breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवरांचे शरद पवरांवरील आरोप क्रीप्टेड’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. अजित पवरांचे शरद पवरांवरील आरोप क्रीप्टेड आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. चारित्र्यहनन करत आहेत. खोटे आरोप अल कायदा टेरेर्स काम करत होती तसे भाजप करत आहे.

हेही वाचा  –  अवकाळी संकट कायम! पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज 

भाजपने पक्ष आणि घर फोडली आहेत. आता नेते तुटत नाहीत. म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जातोय. अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी तसं जावं. सध्या अजितदादा नाही बोलत नाहीत. तर भाजप बोलतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहात आहे. पण तसं होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचं सरकार येईल, असं संजय राऊत म्हणाले.

मला कधीही अटक होऊ शकते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली. सरकार कुणालाही अटक करेल. कायद्याने अडवता येत नाही, म्हणून व्यक्तिगक हल्ले केले जातात. त्यांच्या समाजासाठी ते काम करत आहे. जरांगे सरकारला धोकादायक वाटतात. जे लोक यांना कायद्याने आवरता येत नाहीत. त्यांना हे अटक करण्याचं अस्त्र उगरतात, असं संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button