breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोवा कस्टम विभागाची मोठी कारवाई, दाबोळी विमानतळावर सव्वा कोटींचे तस्करीचे सोने जप्त

गोवा | महाईन्यूज |

गोवा कस्टम विभागाला रविवारी सकाळी दाबोळी विमानतळावर केलेल्या धडक कारवाईत तस्करीच्या सोन्याचे मोठे घबाड हाती लागले. जवळपास तीन किलोग्राम वजनाची ही सोन्याची बिस्किटे असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांची किंमत 1 कोटी 11 लाख 58 हजार एवढी आहे. हे सोने विमानातील शौचालयात बेवारस आढळून आले.

दाबोळी विमानतळावर तस्करीचे सोने उतरवले जाणार असल्याची गुप्त माहिती विमानतळावरील गोवा कस्टम विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने संशयितांवर पाळत ठेवली होती. मात्र, या अधिकाऱ्यांना कोणी संशयित आढळला नाही. त्यामुळे त्यांनी नियमित तपासणीचा भाग म्हणून दाबोळीच्या धावपट्टीवर दाखल झालेल्या विमानांची झडती घेण्यास सुरुवात केली.

विमानातील आसने आणि लगेचच्या जागा तपासून कुठे काही आढळून न आल्याने या पथकाने आपला मोर्चा विमानातील मागच्या शौचालयाकडे वळवला असता या शौचालयातील कोमोडच्या मागे लपवून ठेवलेल्या अवस्थेत एका पर्समध्ये हे सोने आढळून आले. हे सोने बिस्किटच्या स्वरूपात होते. त्या पर्समध्ये 992 ग्रॅम वजनाची प्रत्येकी तीन बिस्किटे आढळून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 1 कोटी 11 लाख 58 हजार व 884 रूपये एवढी आहे. कस्टमच्या पथकाने हे सोने जप्त केले आहे. मात्र तस्कर काही कस्टमच्या हाती लागू शकला नाही.

ही कारवाई गोवा कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्त व्हाय. बी. सहारे व संयुक्त आयुक्त प्रज्ञशिल जुमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button