breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘कोरोना काळात गुलाबराव पाटलांकडून लाखोंचा भ्रष्टाचार’; संजय राऊतांचा आरोप

काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावात सभा होणार आहे. मात्र, या सभेवूर्वी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळात भ्रष्टाचार केला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, जळगावमध्ये गुलाबो गँग आहे. ज्यांनी ५० कोटी रूपये घेऊन शिवसेना सोडली. हे लोक शिवसेनेच्या मेहेरबानीने निवडून आले आणि मग विकले गेले. ते आज आम्हाला धमक्या देत आहेत. पण जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले.

माझ्याकडे गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. कोरोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचं व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गँगचे सदस्य चिमनराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, हे प्रकरण दाबलं जात आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button