breaking-newsराष्ट्रिय

ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅटमधील मते जुळवून पहा- कॉंग्रेस

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन बोगस मतदान टाळण्यासाठी मोजणीच्या टेबलवर पक्षांच्या प्रतिनिधींसमोर सर्व ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅटशी मते जुळवून पहाण्याची मागणी केली. त्याचबरोबर बादामी येथील एका हॉटेलमधून पोस्टल मतपत्रिका जप्त केल्याप्रकरणी संबंधीत लोकांवर आणि पक्षांवर कारवाईची मागणी केली.

काँग्रेसने सांगितले की, निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी अधूनमधून कोणत्याही एका ईव्हीएमशी त्याला जोडलेल्या व्हिव्हिपॅटमधील पावत्यांशी मते जुळवून पाहिली जातील. मात्र, आम्ही सर्व ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅटमधील पावत्या जुळवून पाहण्याची मागणी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने हॉटेलमधून पोस्टल मतपत्रिका जप्त केल्याचे वृत्त नाकारले असल्याचे काँग्रेसने सांगितले. मात्र, आयोगाने याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली असून चौकशी सुरु केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button