breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

OTT वरील अश्लील मजकूर दाखवण्याविरोधात सलमान खानची मोठी मागणी

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सॉरशिपची खूप गरज

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खान आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. सलमानची लोकप्रियता खूप जास्त आहे, त्यामुळे भाईजानचे नाव अनेकदा चर्चेचा विषय बनते. अलीकडेच सलमान खानने एका अवॉर्ड शोसाठी पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये सलमानने ओटीटी कंटेंटबद्दल मोकळेपणाने बोलला. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सॉरशिपची खूप गरज असल्याचे सलमानने सांगितले.

सलमान खान म्हणाला की, मला वाटते OTT वर सेन्सॉरशिप खूप महत्वाची आहे. या शिवीगाळ, अश्लीलता आणि इंटिमेट सीनवर बंदी घातली पाहिजे. १५ ते १६ वयोगटातील मुलेही ते कुठेतरी पाहतात. जर तुम्हाला मुलगी झाली आणि तिने हे सर्व पाहिले तर तुम्हाला कसे वाटेल? माझ्या मते यासाठी सेन्सॉरशिपची व्यवस्था करायला हवी. जर स्वच्छ कंटेंट असेल तर तो कितीतरी पटीने जास्त चालेल आणि लोकांना तो बघायला आवडेल. अशाप्रकारे सलमान खानने ओटीटी प्लॅटफॉर्म व्लागार्टीबद्दल आपले मत मांडले आहे. सलमानपूर्वी अनेक सेलिब्रिटींनीही या मुद्द्यावर आपला आक्षेप व्यक्त केला आहे.

दरम्यान, अनेक दिवसांपासून चाहते सलमान खानच्या चित्रपटांच्या थिएटरमध्ये रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, अलीकडेच शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील भाईजानच्या कॅमिओची सर्वत्र चर्चा आहे. आता सलमानचा बहुप्रतिक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. २१ एप्रिल रोजी सलमानचा ‘किसी का भाई किसी जान’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button