breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

Twitter : एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो पुन्हा बदलला

Twitter : उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साईटचा लोगो पुन्हा बदलला आहे. एलॉन मस्क यांनी तीन दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो बदलून निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो ट्विटरसाठी वापरला होता, हा बदल फक्त वेबसाठी करण्यात आला होता.

प्राप्त माहीतीनुसार, आता पुन्हा ब्ल्यू चिमणीचा लोगो आणण्यात आला आहे. हा लोगो वेब आणि अ‍ॅप दोन्हीवर दिसत आहे. आता लोगोमध्ये बदल केल्यानंतर, क्रिप्टोकरन्सी Dogecoin मध्ये सुमारे 10% घट झालेली दिसत आहे.

यापूर्वी ट्विटरचा लोगो बदलताच युजर्स आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांनी एकमेकांना या बदलाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. एका युजरने विचारले होते, प्रत्येकाला लोगोवर डोजे दिसत आहे का? काही वेळातच #DOGE ने ट्विटरवर ट्विट करायला सुरुवात केली होती.

युजर्सला वाटले की, कोणीतरी ट्विटर हॅक केले आहे. त्यानंतर काही वेळातच एलन मस्क यांनी एक ट्विट केले होते की, ज्यामध्ये ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केले होते. एलॉन मस्क यांनी एक जुना स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये एका वापरकर्त्याने त्यांना गंमतीने सांगितले की, मस्क यांनी ट्विटर विकत घ्यावे आणि त्याचा लोगो डोजे असा करावा. हा स्क्रिनशॉट शेअर करताना ते म्हणाले, “आश्वासन दिल्याप्रमाणे” त्यांनी कंपनीचा लोगो बदलून दाखवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button