breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजपला मोठा धक्का! आमदार बबन पाचपुतेंचा पुतण्या ठाकरे गटात

मुंबई : भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साजन पाचपुते यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

साजन तुम्ही शिवसेनेत आलात. मी तुम्हाला असाच लटकवणार नाही. कारण मी आईंना सांगितलंय की, साजन यांची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला जबाबदारी दिली तर पेलणार का? साजन नुसतं श्रीगोंधापुरता मर्यादित राहायचं नाही. पूर्ण अहमदनगर आहे, ज्या ज्या वेळेला मला वाटेल त्यावेळेला तुम्हाला महाराष्ट्र पिंजून काढावं लागेल. कारण नवं नेतृत्व आपल्याला तयार करायचं आहे. ही जबाबदारी पेलण्याची ताकद तुमच्यात आहे. त्यामुळे मी तुम्हाला शिवसेनेचं उपनेतेपद देतो आहे. मी थोडे दिवस बघणार, साजन फिरतोय की नाही? साजन एकटा नाहीय, परिवार कशाला आहे मग? आपल्याला सर्व महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. हा सोहळा आनंदाचा नक्कीच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – ‘सरकारच्या अध्यादेशाची वाट पाहणार, तोपर्यंत..’; मनोज जरांगे-पाटील यांचा राज्य सरकारला थेट इशारा

साजन पाचपुते कोण आहेत?

साजन पाचपुते हे माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे बडे नेते बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळवला आणि त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

मध्यंतरी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवली आणि जिंकलीही होती. साजन पाचपुते यांच्याकडे काष्टी तालुक्यातील सरपंच आणि बाजार समितीचे संचालक ही पदं असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. मात्र आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button