breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘काँग्रेसचा चप्पल उचल्या सचिन सावंत’, निलेश राणेंची बोचरी टीका

मुंबई – परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्र लिहित केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप आणि महाविकास आघाडी आमने सामने आले आहेत. भाजप अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेस गृहमंत्र्यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुजरातमध्ये यापूर्वी तत्कालीन डीजी वंजारा यांनी पत्र लिहून आरोप अमित शहांवर गंभीर आरोप केले होते. मग अमित शहांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल केला होता. यावरून आता भाजप नेते निलेश राणेंनी सावंतांवर शाब्दिक हल्ला चढवत बोचरी टीका केली आहे.

 

‘काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही आणि राज्यपालांच्या कोट्यातून पण नाही. ज्याला आमदारकीला फक्त 1200 मतं मिळाली तो सचिन सावंत जनेतून नगरसेवक पण होऊ शकत नाही पण वार्ता एवढ्या मोठ्या करतो की जसं 300 खासदार ह्यानेच निवडून आणले. एक नंबर फालतू, अशा शब्दात निलेश राणेंनी सावंत यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर सचिन सावंत यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुखांचे नाव घेत प्रत्युत्तर दिले होते. गुजरातमध्ये यापूर्वी तत्कालीन डीजी वंजारा यांनी पत्र लिहून आरोप अमित शहांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्यांना त्यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतलं गेलं. मग अमित शहांनी राजीनामा दिला होता का? तसंच आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. मग त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button