Uncategorizedताज्या घडामोडी

नाशिक-पुणे महामार्गावर दोडी येथील एस. पी. पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खड्ड्यात कार आदळून झालेल्या अपघातात प्रवासी ठार

सिन्नरः नाशिक-पुणे महामार्गावर दोडी येथील एस. पी. पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खड्ड्यात कार आदळून झालेल्या अपघातात प्रवासी ठार झाला, तर कारचालक जखमी झाला.

साईनाथ पद्माकर सोनवणे (वय १९, रा. शिर्डी, ता. राहाता) असे मृत प्रवाशाचे नाव असून, या दुर्घटनेमुळे नाशिक-पुणे महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सकाळी नाशिककडून संगमनेरकडे जाणारी कार (एमएच १७ बीव्ही ४८०५) खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात गाडीतील साईनाथ सोनवणे गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णवाहिकेद्वारे सिन्नर येथील जिल्हा शासकीय उपरुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात जखमी झालेल्या चालकावर प्रथमोपचार करण्यात आले. साईनाथचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णवाहिका चालक गणेश काकड यांनी वावी पोलिसांत खबर दिली. सहायक पोलिस निरीक्षक तांदळकर, हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

खड्डे ठरताहेत जीवघेणे
नाशिक-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, जीवघेणे अपघात होऊनही संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहने नादुरुस्त, पंक्चर होत असून, त्यानंतर वाहनचालकांकडून अवाच्या सव्वा पैसे आकारले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. खड्डे न बुजवता टोल नाक्यावर वसुली मात्र नियमाने केली जात असून, रस्त्याच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. गस्तीवरील पोलिसांनीही याबाबत संबंधित यंत्रणांना कळविले होते. त्यानंतर काही भागात दुरुस्तीचे सोपस्कार झाले. मात्र, बहुतांश रस्ता खड्डेमय असल्याने जीवघेणे अपघात वाढले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button