TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

Dolo 650 Uses : यासंबंधी धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : करोनाच्या काळात ताप आल्यानंतर आपण सहज Dolo 650 खातो. कोव्हिड काळात तर ही गोळी आणखीणच प्रसिद्ध झाली होती. पण आता यासंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पॅरासिटामोल औषध म्हणजे Dolo 650 द्यावी यासाठी औषध बनवणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना भेटवस्तू देण्यासाठी १००० कोटींहून अधिक खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैद्यकीय प्रतिनिधींच्या एका संस्थेने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आरोप करत ही माहिती दिली. कोविड महामारीच्या काळात ‘डोलो’ हे औषध खूप लोकप्रिय झाले आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय पारीख यांनी खंडपीठाला दिलेल्या माहितीनुसार, “डोलो कंपनीने 650mg फॉर्म्युलेशनसाठी १००० कोटी रुपयांहून अधिक मोफत भेट दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अहवालाचाही त्यांनी माहितीचा स्रोत म्हणून उल्लेख केला.

‘कोविड झाला तेव्हा मीही तेच घेतले…’
करोनाच्या दरम्यान मीदेखील हीच गोळी खाल्ल्याची माहिती न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्यासमवेत खंडपीठात सामील झालेले आणि खंडपीठाचे नेतृत्व करणारे डीवाय चंद्रचूड यांनी दिली. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या औषधांच्या निर्मिती आणि किंमत नियंत्रणावर चिंता व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने संजय पारिख यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगितले.

न्यायालयाने आता केंद्राला एका आठवड्यात जनहित याचिकांवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे आणि १० दिवसांनी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल. ही गंभीर बाब आहे, असं खंडपीठाने म्हटले आहे.

५०० मिलीग्रामपर्यंतच्या कोणत्याही टॅब्लेटची बाजारातील किंमत सरकारच्या किंमत नियंत्रण यंत्रणेच्या अंतर्गत नियंत्रित केली जाते. परंतु ५०० मिलीग्रामच्या वर असलेल्या औषधाची किंमत उत्पादक फार्मा कंपनी ठरवू शकते, असे ते म्हणाले. त्यांनी युक्तिवाद केला की उच्च नफ्याचे मार्जिन सुनिश्चित करण्यासाठी, कंपनीने डॉक्टरांना डोलो-६५० मिलीग्राम गोळ्या लिहून देण्यासाठी मोफत भेटवस्तू वितरीत केल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button