breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्यातील भाजपानं मौन सोडलं

मुंबई | महाईन्यूज

ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीही करू शकत नाहीये. शिवरायांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे. काल भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात प्रकाशित झालेलं ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलेलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, हे वारंवार स्पष्ट करताना मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरदेखील भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं पवारांवर जाणता राणा पुस्तक लिहिलेलं होतं. प्रत्येक पक्षात असे कार्यकर्ते असतात. जाणते राजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजच होते. शिवरायांची तुलना पंतप्रधान मोदी, शरद पवारांसोबत होऊ शकत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button