breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

भाजप नेते गोपीचंद पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल

जेजूरी |महाईन्यूज|

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शनिवारी शरद पवारांच्या उपस्थित होणार आहे. मात्र, आज पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहोचले आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन केलं. यानंतर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा दावा केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. पोलिस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत असून उद्या शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण पार पडणार आहे, असं देशमुख म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button