TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

रुपीनगर येथे प्रायमरी शिक्षणाचा महोत्सव उत्साहात; शितल वर्णेकर यांच्या माध्यमातून यशस्वी आयोजन

सामाजिक बांधिलकी : परिसरातील २५० मुलांना प्री-प्रायमरी शिक्षणासाठी घेतले दत्तक

पिंपरी : प्रायमरी शिक्षणाचा महोत्सव सुरवात काल रुपीनगर तळवडे येथे एक आगळावेगळा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम पार पडला. गेली १ महिन्यापासून सुरुवात झालेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन व लकी ड्रॉ सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या माध्यमातून रुपीनगर, तळवडे, सहयोग नगर, परिसरातील 250 मुलांना प्री-प्रायमरी शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. 800 पेक्षा जास्त पालकांनी यासाठी अर्ज सादर केले होते व त्यातील लकी ड्रॉ मध्ये 250 मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. केंब्रिज इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या उद्घाटन प्रसंगी ह.भ.प धर्माचार्य ॲड. शंकर महाराज शेवाळे, कामगार नेते इरफान भाई सय्यद, केंब्रिज शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व परिवाराची प्रगती व्हावी हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असतं परंतु सर्वसामान्य पालकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेणे शक्य नसते याचा विचार करून प्राथमिक स्वरूपात या वर्षी 250 मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण व त्याचबरोबर सर्वांगीण विकास केला जाईल असे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय वर्णेकर यांनी केले.

सौ शितलताई धनंजय वर्णेकर व श्री धनंजय वर्णेकर हे या भागामध्ये नेहमीच सामान्य नागरिकांच्या समस्या व कौटुंबिक कार्यात कार्यरत असतात. नेहमीच समाजोपयोगी व ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच लहान मुले या सर्वांसाठी नेहमीच उपक्रम राबवत असतात. शिक्षणा शिवाय प्रगती नाही. आज सर्वसामान्य पालकांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घेणे अवघड आहे पण सौ. शितलताई वर्णेकर यांनी माझ्या भागातील मुलांच्या शिक्षणाची व प्रगतीची व हे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याची जबाबदारी माझी आहे .तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच आपलेपणाने व आपली जबाबदारी समजून वर्णेकर कुटुंब समाजकार्य करत आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा मंत्र दिला आणि तो खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे कार्य करत आहे. असे उद्गार ह.भ.प शंकर महाराज शेवाळे यांनी केले.

समाजातील प्रत्येक घटकाला भरभरून देण्याचे कार्य शितलताई करत आहेत शिक्षणाबरोबर भारतीय संस्कृती जपण्याचं काम हे संस्था करत आहे हे काम करण्याचे धाडस फक्त वर्णेकर कुटुंबीयच करू शकतात असे मा.श्री. कामगार नेते इरफान भाई सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. अत्यंत सुंदर अशा वातावरणात उत्कंठा वाढवणारा लकी ड्रॉ, रंगीबेरंगी वेशातील लहान मुले ,पालक अशा पध्दतीने उत्तमरीतीने शेवटपर्यंत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी विभागातील सर्व मान्यवर, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शांताराम दगडू भालेकर,माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक शांताराम कोंडीबा भालेकर,नवमहाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक श्री गौंड सर,विलास तात्या भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडाभाऊ भालेकर,माजी शिक्षण मंडळाचे सभापती श्री. धनंजय भालेकर,अनिल भालेकर,सुखदेव आप्पा नरळे,शरद भालेकर, उत्तम पाटील,रामभाऊ भालेकर, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पतंगे गुरुजी, अध्यक्ष कॅप्टन कदम साहेब, घारजाईमाता जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीवाळूंजकर , शिरीषभाऊ उत्तेकर ,गारगोटे सर,गणेश भालेकर, गौतम दळवी सर,संदिप जाधव, सोमनाथ मेमाने,रामदास कुटे,दादा सातपुते,समीर मुल्ला,जावेद शेख,बळीराम जाधव,राहुल पिंगळे, अकलाख शेख,आशिष गौंड,,बंडू शेठ भालेकर, नूर शेख,पत्रकार औदुंबर पाडुळे,सौ. अस्मिताताई भालेकर, सौ. वैशाली ताई भालेकर,शितलताई पारखी,स्वातीताई कासार,काकडे ताई,सुलभाताई बोडके, तसेच मोठ्या प्रमाणात पालक व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदक अक्षय मोरे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button