breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

आम्ही देश सोडून पळाल्याच्या अफवा अत्यंत क्लेशकारक – पुनावाला

 

लंडन – सध्याच्या घडीला देशात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांचे प्रत्येक वक्तव्य आणि कृतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. अशातच काही दिवसांपूर्वी अदर पुनावाला आणि त्यांचे वडील लंडनमध्ये गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यांनी देश सोडल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. यावर अदर पुनावाला यांच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. मी आणि माझा मुलगा अदर पुनावाला देश सोडून पळालेलो नाही. आम्ही केवळ सुट्टीसाठी लंडनमध्ये आलो आहोत, असे वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केले. आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्या असल्याचे सायरस पुनावाला यांनी म्हटले.

प्रत्येक उन्हाळ्यात आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येते. त्यामुळे आम्ही देश सोडून कुठेही पळालेलो नाही, असे सायरस पुनवाला यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमुळे पुनावाला कुटुंबीय गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहेत. आतापर्यंत भारतात देण्यात आलेल्या एकूण लसींपैकी 90 टक्के लसी या सिरम इन्स्टिट्यूटकडून पुरवण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button