breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

दारूच्या नशेत टायगर श्रॉफबद्दल हे काय बोलला…ः राम गोपाल वर्मा

Rohit Sharma's explosive innings?

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

बॉलिवूडमध्ये सध्या अॅक्शन हिरो म्हणून टायगर श्रॉफ आणि विदु्यत जमवाल यांनी त्यांची ओळख मिळवली आहे. हे दोघेही त्यांच्या सिनेमात अॅक्शन सीन देण्याबरोबरच मार्शल आर्टवरही भर देतात. त्यांच्या याच कौशल्यामुळे दोघांची तुलनाही केली जाते. विदयुत जमवाल मार्शल आर्टिस्ट म्हणवून घेतो पण टायगरला मात्र मार्शट आर्टिस्ट या सोबतच एक अभिनेता म्ह्णूनही चाहत्यांनी पसंती द्यावी असं वाटतं. आता बॉलिवूडमध्ये विद्युत आणि टायगर यांची नाव २०१७ साली विशेष चर्चेत आली होती, तेही राम गोपाल वर्मा यांच्यामुळे. त्यांचा पाच वर्षापूर्वीचा एक ऑडिओ व्हायरल झाला असून यामध्ये राम यांची जीभ टायगरविषयी घसरली होती.

विद्युत जामवालने केलेलं २०१७ सालचं एक ट्वीट व्हायरल झालं आहे. यामध्ये रामगोपाल वर्मा यांचा आवाज असलेली एक क्लीप चर्चेत आली आहे. या ऑडिओमध्ये रामगोपाल वर्मा हे टायगर श्रॉफविषयी उलटसुलट बोलत आहेत. टायगरची खिल्ली उडवणारी, त्याची चेष्टा करणारी विधानं वर्मा यांच्या तोंडी आहेत. यापूर्वीही अनेकदा वर्मा यांनी टायगरविरोधात अपमानास्पद ट्वीट केली आहेत. आता विद्युतने शेअर केलेल्या या ऑडिओमध्ये रामगोपाल वर्मा मद्यधुंद अवस्थेत टायगरवर भाष्य करताना ऐकू येत आहेत.

या ऑडिओमध्ये विदयुत रामगोपाल वर्मा यांना असं विचारत आहे की, वर्माजी, तुम्ही असं का करत आहात. त्यावर वर्मा यांचं उत्तर आहे की, टायगर आणि विदयुत यांनी सार्वजनिक ठिकाणी भांडण केलं पाहिजे आणि ते मला बघायला आवडेल. दोघांमध्ये कोणाची हार होते आणि कोणाची जीत हे मला बघायचं आहे. या संवादामध्ये वर्मा हे टायगरची खिल्ली उडवत आहेत. त्यांनी विद्युतला चांगला कलाकार म्हटलं आहे तर टायगर श्रॉफला तो मुलगी आहे असं म्हटलं आहे. वर्माच्या विधानावर विद्युत हसत असल्याचे ऐकू येते. हा ऑडिओ विद्युतने शेअर केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button