breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रराष्ट्रिय

रोहित शर्माची धमाकेदार खेळी?

हैदराबाद । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो या मरो असाच असेल. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी रोहित शर्मा एक मोठी खेळी खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आजच्या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघात एका मॅचविनर खेळाडूची एंट्री होणार आहे.

हर्षल पटेल आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे, त्यामुळे संघ व्यवस्थापन आजच्या सामन्यात दीपकला संधी देण्याचा विचार करू शकते. याशिवाय चहललाही आपल्या गोलंदाजीने प्रभाव पाडण्यात अपयश आले आहे, त्यामुळे भारतीय संघ आज अश्विनला आजमावू शकतो. त्याचबरोबर या दोन ठिकाणांव्यतिरिक्त संघात बदलाला फारसा वाव नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हर्षलच्या जागी भारतीय संघात एक दमदार
खेळाडू प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आतापर्यंत आपल्या अष्टपैलू खेळाने दीपक चहरने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात आता चहरचा समावेश होऊ शकतो. हर्षल आणि भुवेनश्वरसाठी चहर हा एक चांगला पर्याय असेल. त्यामुळे आजच्या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघात चहरला संधी मिळू शकते. आजच्या सामन्यात हर्षल पटेलबरोबर युजवेंद्र चहललाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. चहलच्या जागी. आर. अश्विन यावेळी संघात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

आज तिसरी टी-२०
ठिकाण-राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम, हैदराबाद

थेट प्रक्षेपण-संध्याकाळी ७ पासून स्टार स्पोर्ट्स

गेल्या ५ सामन्यात-ऑस्ट्रेलियाचे तीन विजय तर भारताचे दोन विजय

खेळपट्टीचा अंदाज
तीन वर्षांनंतर हैदराबादमध्ये टी-२० लढत. गवताचे पातेही नसलेल्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस अपेक्षित आहे.

हवामानचा अंदाज
आठवडाभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान होते; पण शनिवारपासून काळ्या ढगांचे आक्रमण झाले आहे. सामन्यापूर्वी आही सरींची अपेक्षा देखील असेल. मात्र, लढत ढगाळ वाटवरणात होईल.

भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन/चहल, अक्षर पटेल, दीपक चहर/हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button