breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शिवसेना अन् राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त लोकसभेसाठी जवळ घेतलं’; रोहित पवार यांची टीका

मुंबई : देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाराष्ट्रात भाजपाला चांगलाच फायदा होणार आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांना भाजपानं फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. पण, लोकांच्या मनात भाजपाच्या विरोधात वातावरण आहे.

भाजपा फक्त लोकसभेचा विचार करत आहे. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपानं फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. मात्र, लोकसभेला लोकांच्या मनातील वातावरण पाहिलं, तर भाजपाच्या विरोधात आहे. भाजपाबरोबर गेलेल्या लोकांना कुठेही लोकमत आणि जनमत राहिलं नाही, असं रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा – मनोज जरांगेंच्या किडन्यावरून गोंधळ; वाचा नेमका घोळ काय?

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावरून रोहित पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते. मला असं वाटतं, भाजपाचे मोठे नेते मुद्दाम या छोट्या नेत्यांना पुढे करतात. परत म्हणतात की, या नेत्यांच्या विरोधात बोल… शरद पवार यांच्याबद्दल बोलले, आम्ही समजू शकतो. पण, अजित पवारांना बरोबर घेऊन त्यांच्याविरोधात बोलतात. हे भाजपाचं राजकारण आहे, असं रोहित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button