breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडी

Ganesh Utsav 2023 : गणपतीत अथर्वशीर्ष पठण करताना ‘या’ नियमांचे करा पालन

Ganesh Utsav 2023 : अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. हजारो भाविक ते दररोज म्हणत असतात. काहींचा तर नेमच असतो. मात्र, गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम पाळावे लागतात. ते नियम पाळून अथर्वशीर्षाचे पठण केल्यास उत्तम फलश्रुती प्राप्त होते,

असे सांगितले जाते. जाणून घ्या…

  • अथर्वशीर्ष म्हणताना पाळावयाचे नियम
  • अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे, वडिलधार्‍यांना आणि गुरुंना नमस्कार करावा. तसेच पठण करताना मांडी पालटणार नाही याची काळजी घ्यावी.

हेही वाचा – ‘शिवसेना अन् राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त लोकसभेसाठी जवळ घेतलं’; रोहित पवार यांची टीका 

  • अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसू नये. याऐवजी अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
  • अथर्वशीर्ष पठण करताना शब्दांचे उच्चार अगदी स्पष्ट असावे आणि भावपूर्वक एका लयीत म्हणावे. तसेच त्याचा अर्थही समजून घ्यावा.
  • तुम्ही एकाहून अधिक वेळा अथर्वशीर्ष पठण करणार असाल तर ते ‘वरदमूर्तये नमः।’ इथपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती आहे, ती सर्वात शेवटी म्हणावी.
  • त्याचप्रमाणे अथर्वशीर्षाच्या आधी दिलेला शांतीमंत्र देखील सुरुवातीला एकदाच म्हणावा, तो प्रत्येक पठणापूर्वी म्हणू नये.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button