breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे (पाटील) यांच्या 35 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान समारंभ आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
रविवारी (दि. 6 जून) पिंपरी गावातील कै. भिकु वाघेरे (पाटील) यांच्या पुतळ्यास सकाळी 9 वाजता महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येईल. 9:30 वाजता नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानात रक्तदान शिबीराचे उद्घाटन होईल. यानंतर डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.