breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्रणिती शिंदेच्या संतापानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले,..

आमदार प्रणिती ताईं माझ्या मोठ्या भगिनी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावी अशी मागणी केली होती. आमदार रोहित पवार यांच्या या मागणीवरून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार? रोहित पवार अजुन मॅच्युअर नाहीत, अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली होती. त्यानंतर सोलापूरमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. यावर अखेर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायेत, पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया! असं म्हणत रोहित पवार यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचं काम केलं आहे.

राहीला प्रश्न सोलापूरच्या जागेचा तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, मी कुठलाही दावा केला नव्हता, मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती, असंही रोहित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button