breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी ब्रिगेडतर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात सुमारे ५७० नागरिकांनी लाभ घेतला.

संभाजी ब्रिगेड व रेड स्वस्तीक सोसायटी यांच्या वतीने वाल्हेकरवाडीच्या त्रिवेणी हॉस्पिटल आयोजित केले होते. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अभिषेक बारणे, सुरेश भोईर, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी सहआयुक्त अमृतराव सावंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक शांताराम कुंजीर, जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, शहर अध्यक्ष सुधीर पुंडे, संपर्क प्रमुख नकुल भोईर, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, राजेंद्र देवकर, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, प्रदेश संघटक मंगेश शिगवण, शेतकरी कामगार पक्षाचे हरीश मोरे, भालचंद्र फुगे, दुर्गामृत दुध संघाचे चेअरमन हणुमंत चव्हाण,जल संवर्धन समितीचे अध्यक्ष मुजफ्फर इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव विशाल जाधव, बहुजन वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष गुलाब पानपाटिल, मुंबई माजी नगरसेविका जनाबाई जाधव, यांची उपस्थिती होते.

या मोफत आरोग्य शिबीरास प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ मोहन पवार, डॉ अश्वीनी पवार, डॉ देवयानी पाटील, स्त्रीरोग तज्ञ संजय पोंधे, शल्य चिकित्सक डॉ भरत ओझा, वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ प्रितम सुलाखे, बालरोग तज्ञ डॉ प्राजक्ता भोकरे, नेत्ररोग तज्ञ डॉ आशिष कांबळे, डॉ राजहंस भोकरे, डॉ अभिजित शिंदे, छाती व उरोरोग तज्ञ डॉ अभिजित सांयबंर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रुग्णांची तपासणी, उपचार करण्यात आले.

तसेच शिबिरार्थींना सेवा व सुश्राषा प्रदान करणा-या डॉक्टर आणि सहकारी कर्मचारी वृंदाना संभाजी ब्रिगेडतर्फे आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव लोभे, रशीद सय्यद, अमोल धोडसरे, मंगेश चव्हाण, परशुराम रोडे यांनी अथक परिश्रम घेतले. तर शिबीराचे आयोजन सतिश काळे परमेश्वर जाधव यांनी केले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button