breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची जामिनावर सुटका

नवी दिल्ली |

रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयातील जामिनाबाबतची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर राजदचे अध्यक्ष लालू्प्रसाद यादव यांची गुरुवारी सायंकाळी कारागृहातून सुटका करण्यात आली. तथापि, ते आणखी काही उपचारांसाठी अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) थांबणार आहेत. लालूप्रसाद यांच्या वकिलांनी रांचीतील सीबीआय न्यायालयात प्रत्येकी १ लाख रुपयांच्या दोन हमी सादर केल्या.

यानंतर न्यायाधीश एम.के. मिश्रा यांनी यादव यांच्या सुटकेचा आदेश जारी केला. जामिनाच्या अटींचे पालन केल्यानंतर हा आदेश बिरसा मुंडा कारागृहात पोहचला. सध्या न्यायालयीन कोठडीत एम्समध्ये उपचार घेत असलेले लालूप्रसाद यांची यानंतर सायंकाळी सुटका करण्यात आली. लालूप्रसाद यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार ते व्याधींवरील उपचारांसाठी आणखी काही काळ एम्समध्ये थांबणार आहेत.

वाचा- #Covid-19: उस्मानाबादमध्ये हवेतून प्राणवायू निर्मितीचे पाच प्रकल्प!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button