breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून जारी

नवी दिल्ली |

कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केल्या. घरी असताना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करू नये आणि केवळ रुग्णालयातच हे इंजेक्शन रुग्णाला दिले जावे, असा सल्ला त्यात देण्यात आला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तोंडावाटे स्टेरॉइड्स दिले जाऊ नयेत व सतत ताप, वाढत जाणारा खोकला इ. लक्षणे सात दिवसांहून अधिक काळ कायम राहिल्यास कमी मात्रेतील ओरल स्टेरॉइड्सच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला जावा, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

६० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांना, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, फुप्फूस, यकृत किंवा मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण यांसारख्या सहव्याधी असलेल्या लोकांनाच उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत योग्य तपासणीनंतर गृहविलगीकरणाची परवानगी दिली जावी, असे सुचवण्यात आले आहे. प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्यास किंवा श्वाासोच्छवासास त्रास होत असल्यास संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले जावे आणि त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घेतला जावा, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.

वाचा- #Covid-19: उस्मानाबादमध्ये हवेतून प्राणवायू निर्मितीचे पाच प्रकल्प!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button