breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील भाजपा नगरसेवकांची नियत कौरवांसारखी: रुपाली चाकणकर

पुणे | प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे परंतु यांची नियत मात्र १०० कौरवांसारखी आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान भाजप नगरसेवकांच्या बेजबाबदार वर्तणूकीने पुणेकरांची मान शरमेने खाली गेली असल्याचे सांगतानाच महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर एक आचारसंहिता आणि नियमावली तयार करून त्यांना योग्य ते संरक्षण पुरवावे अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज पोलीस आयुक्तांना व मनपा आयुक्तांना भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली.

जवळपास १०० नगरसेवक असणाऱ्या पुणे महानगरपालिकेत भाजपच्या टोळीतील नगरसेवक धनराज घोगरे यांनी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याशी उर्मटपणाचे वर्तन करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा आणि मनपातील महिला आरोग्य अधिकार्‍यांवर धावून जाणे, गैरवर्तन करणे,
खालच्या पातळीवर भाषा वापरण्याचे प्रकार वाढले असून याचे live record केले जाते हे अत्यंत खेदजनक व निंदनीय बाब आहे.असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही रुपालीताई चाकणकर यांनी दिला आहे.


कोरोना या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या अशा महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची गरज असल्याचे निवेदनात रुपालीताई चाकणकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button