breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

चेन्नईची धुरा यंदा मराठी माणसाच्या हातात, धोनी कर्णधार पदावरून पायउतार

Ruturaj Gaikwad | क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२४ च्या हंगामातील पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात रंगणार आहे. यावेळी दोनही संघ सज्ज असताना चेपॉक स्टेडियम देखील सज्ज झालं आहे. मात्र यादरम्यान चेन्नईच्या ताफ्यात नवी घडामोड घडली आहे.

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. एमएस धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

हेही वाचा     –     ‘आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं जातं, पण..’; निवडणूक रोख्यांबद्दल ओवैसीचं महत्वाचं विधान

धोनीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि लिहिले होते की, यावेळी तुम्ही त्याला एका नवीन भूमिकेत पाहणार आहात आणि त्याने हा निर्णय घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि संघाचे कर्णधारपद सोडले. यावेळी धोनी सीएसकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळताना दिसणार असून ऋतुराज त्याच्या देखरेखीखाली ही जबाबदारी सांभाळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button