breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

IPL 2020: खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावणाऱ्या मुलीचा फोटो व्हायरल; पाहा आहे तरी कोण?

मुंबई | महाईन्यूज

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव झाला आहे. यामध्ये आयपीएल मधील आठ संघाचे मालक व सहमालक यांच्यासह प्रत्येक संघाचे प्रशिक्षक संघाला आवश्यक असणाऱ्या खेळाडूंवर बोली लावत होते. या लिलावादरम्यान खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावताना एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून लिलावा दरम्यान संघाचे मेंटर वीवीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस उपस्थित होते. मात्र या सर्वांसोबत एक मुलगी देखील सामील असल्याचे सर्वांच्या नजरा तिच्याकडे जात होत्या, ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधि मारन यांची मुलगी काव्या मारन. काव्या सनरायझर्य हैदराबाद संघाची सहमालक देखील आहेत.

https://twitter.com/GSMadhan_offl/status/1207673459624554497
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button