breaking-newsTOP Newsक्रिडाटेक -तंत्रताज्या घडामोडी

ऋषभची एक कोटीची कार आहे सुरक्षेच्या बाबतीत अव्वल

या कारमध्ये आहेत एकापोक्षा एक चांगली फिचर्स

पुणे : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारचा शुक्रवारी पहाटे दिल्लीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कारची काच फोडून त्याला गाडीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर कारने पेट घेतला. मात्र त्याची कार सुरक्षेच्या बाबतीत कशी आहे.
ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा त्याच्याकडे असणारी ‘मर्सिडीज GLE 43’ ही कार होती. या गाडीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. ही कार सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित मानली जाते. मात्र, कारचा स्पीडच इतका होता की सुरक्षेची इतकी साधने असूनही उपयोग झाला नाही, असं बोललं जात आहे.
अपघातावेळी ऋषभच्या कारचा वेग ताशी 150 किमी असल्याचं सांगितले जात आहे. कार 200 मीटरपर्यंत फरफटत गेली व त्यानंतर कारने पेट घेतला यात कार पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये पंतला वेळीच गाडीच्या बाहेर काढण्यात आले. मात्र ऋषभ पंतच्या डोक्याला, उजव्या मनगटाला आणि घोट्याला दुखापत झाली आहे.
मर्सिडीज GLE 43 या कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग आहे. 2019 मध्ये मर्सिडीज-बेंझ GLE 43 ला युरो एनसीएपीकडून सर्वोच्च 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. याचे कारण सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, सीट बेल्ट वॉर्निंग, स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह ब्रेक लाइट्स, टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि मर्सिडीजची प्री-सेफ ऑक्युपंट प्रोटेक्शन सिस्टम, मिडल रीअर थ्री-पॉइंट सीटबेल्ट आहे. तसेच ओव्हर स्पीड वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंगही आहे.
मर्सिडीजच्या या कारमध्ये २९९६ सीसी V Type पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ६१००आरपीएमवर ३८४ बीएचपी पॉवर आणि २०००-४२०० आरपीएमवर ५२०एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. कारमध्ये ५ व्यक्ती सहज बसू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button