breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

ठरलं तर..! या दिवशी ‘शेरशाह’ कपल करणार लग्न

‘सिद्धार्थ आणि कियारा’ राजस्थानच्या जैसलमेर पॅलेसमध्ये घेणार सप्तपदी

मुंबई : बॉलिवूडमधील लव्ह बर्डस कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लवकरच लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसापासुन सुरू आहेत. हे कपल लग्न करणार याबद्दल माहिती समोर आली आहे. नव्या वर्षात हे दोघं लग्न करू शकतात असं काही दिवसांपूर्वीच बोललं जात होतं त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
इ-टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार कियारा-सिद्धार्थ हे दोघे ६ फेब्रुवारी २०२३ ला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. तर लग्नाच्या आधीचे मेहंदी, हळद, संगीत यांसारखे कार्यक्रम आणि विधी ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहेत. या कार्यक्रमांना कियारा आणि सिद्धार्थचे नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित असणार आहे. तर सिद्धार्थ आणि कियारा राजस्थानच्या जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये सप्तपदी घेणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. मात्र सिद्धार्थ आणि कियारा यांपैकी कोणीही या वृत्ताची पुष्टी अद्याप केलेली नाही. सध्या हे दोघंही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दुबईला गेलेले आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. या चित्रपटात दोघांच्या अभिनयासोबतच चाहत्यांना केमिस्ट्रीही खूप आवडली. यानंतर सिद्धार्थ आणि कियारा अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. अलीकडेच दोघेही मनीष मल्होत्राच्या पार्टीतही एकत्र पोज देताना दिसले.
सोबतच, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी कॉफी विथ करणवर त्यांच्या नात्याची पुष्टी केल्यापासून ते अनेकदा लग्नाच्या प्रश्नांचा विषय बनले आहेत. वादग्रस्त टॉक शोमध्ये, सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी एकमेकांना डेट करण्याचे संकेत दिले होते. करणने त्यांच्याकडून काही मसालेदार माहिती मिळविण्याची खात्री केली. योगायोगाने, शाहिद कपूरनेही कियारा अडवाणीसोबत कॉफी विथ करण 7 मध्ये दिसल्यावर लग्नाचे संकेत दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button