breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रसातारा

साताऱ्यातील पुसेसावळीत दोन गटांमध्ये राडा, दोन गुन्हे दाखल

सातारा : साताऱ्यातील औंध पुसेसावळी येथे काल दोन गटांत दंगल झाली आहे. सोशल मीडिया पोस्टवरून वातावरण बिघडल्याची माहिती आहे. यानंतर अनेक वाहने पेटवण्यात आली आणि मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरून गेल्या दोन-चार दिवसांपासू गावातील वातावरण धुमसत होते. रविवारी रात्री वाद उफाळून आल्याने दंगल उसळली. जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली. यामध्ये एका केअर टेकरचा मृत्यू झाला आहे. नूर हसन शिकलगार असं या व्यक्तीचं नाव आहे.

हेही वाचा – India vs Pakistan : भारत-पाकिस्तानचा उर्वरित सामना आज होणार, पावसाची शक्यता किती?

खासदार उदयनराजे भोसले हे आज सकाळी पुसेसावळीत दाखल झाले. त्यांनी दोन्ही समाजाच्या लोकांशी संवाद साधून शांततेचे आवाहन केले आहे. या दंगलीमुळे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सकाळपासून इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button