breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानचा उर्वरित सामना आज होणार, पावसाची शक्यता किती?

INDvsPAK : आशिया चषकातील भारत-पाकिस्तान बहुचर्चित सामना काल पावसामुळे थांबवण्यात आला. हा सामना आज दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. भारताना २४.१ षटकात २ बाद १४७ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह डे म्हणजे आज हा सामना खेळला जाईल.

भारताना नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामवीरांनी चांगली सुरूवात केली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावत पहिल्या विकेटआधी १२१ धावा केल्या. सध्या भारताची धावसंख्या २४.१ षटकात २ बाद १४७ आहे. केएल राहुल २८ आणि विराट कोहली ८ धावांवर खेळत आहे.

हेही वाचा – ‘ठाकरे सरकार पडताना महायुतीत जाण्याचं काहींनी पत्र दिलं’; अजित पवारांचं मोठं विधान 

मात्र समजा जर आजही, कोलोंबोमध्ये आजही पाऊस झाला आणि दोन्ही संघांमधील सुपर 4 सामना राखीव दिवशी वॉशआउट झाला तर भारत आणि पाकिस्तानचे मॅच पॉइंट्स शेअर होतील. मंगळवारी पाकिस्तानचा सामना संपल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत रोहित व संघ पुढील सुपर फोर सामन्यात श्रीलंकेशी भिडतील.

पावसाची शक्यता किती?

आज सुद्धा कोलोंबोमध्ये हवामान फार आशादायक दिसत नाही. हवामानाचे अंदाज वर्तवणाऱ्या विविध वेबसाईट्सच्या माहितीनुसार आजही पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. AccuWeather ने आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून पावसाची ८० टक्के शक्यता वर्तवली आई तर. Weather.com वरील तासाभराच्या हवामान अंदाजानुसार, दुपारी ३ नंतर पावसाची ७० टक्के शक्यता आहे. टक्क्यांहून कमी होत नाही, सर्वाधिक पावसाची शक्यता ५:३० वाजता सुमारे ८२ % आहे तर सर्वात कमी (७२ %) संध्याकाळी ६.३० वाजता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button