TOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘क्रेडाई’च्या प्रशिक्षणार्थींचे जागतिक स्पर्धेत प्रतिनिधित्व

पुणे: जागतिक व्यासपीठावर भारतीय बांधकाम कौशल्याची छाप उमटविण्याच्या हेतूने पुण्यातील कुशल ‘क्रेडाई’चे मोहनीश कमल आणि संजीवकुमार सबावत हे दोन प्रशिक्षणार्थी जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. कमल हा ऑस्ट्रिया येथील ‘ब्रिक लेयिंग’ स्पर्धेत, तर संजीवकुमार हा इटली येथील ‘वॉल आणि फ्लोअर टायलिंग’ स्पर्धेत घेणार भाग घेणार आहे. हे दोन्ही स्पर्धक राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आहेत. कुशल क्रेडाई आणि रोटरी क्लब ऑफ रीव्हारसाईडतर्फे या दोन्ही प्रशिक्षणार्थींना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘कुशल-क्रेडाई’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सदस्य मिलिंद तलाठी, समीर बेलवलकर, पराग पाटील, डॉ. डी. के. अभ्यंकर, ऊर्मिला जुल्का या वेळी उपस्थित होत्या.

जागतिक कौशल्य स्पर्धा ही ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील युवक हे विविध कौशल्यांचे सादरीकरण करतात. यामध्ये यंदा भारताचे प्रतिनिधी हे आपल्या बांधकाम कौशल्यांचे सादरीकरण करणार आहेत. इटली येथे १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘वॉल आणि फ्लोअर टायलिंग’ स्पर्धेत संजीव कुमार याच्यासोबत जे. पी. श्रॉफ आणि मिलिंद तलाठी रवाना होणार आहेत. तर २० नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रिया येथे होणाऱ्या ‘ब्रिक लेयिंग’ स्पर्धेत मोहनीश कमल, पल्लवी कोठारी सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button