breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात सामील : ठाकरे गटाला मोठा धक्का!

  • गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

ठाकरे गटात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.

मागील काही दिवसांपासून गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होता. गोरेगाव येथे ठाकरे गटाच्या मेळाव्यात आणि दसऱ्याला बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूक केली, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यातच गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ( ११ नोव्हेंबर ) गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लोकधिकार समिती महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या समितीचे गजानन किर्तीकर अध्यक्ष आहेत. पण, या कार्यक्रमाला किर्तीकर हेच अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

मोठा फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता
शिवसेनेचे लोकसभेचे 12 खासदार आधी शिंदे गटात सामील झाले आहेत. यात राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. यात गजानन किर्तीकर यांची भर पडली आहे. गजानन किर्तीकर हे शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंसोबत गेल्याने महत्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाण्याची शक्यता आहे. याचा मोठा फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता आहे.

गजनान कीर्तिकर एकनाथ शिंदेंसोबत मुलगा ठाकरेंसोबत
अमोल कीर्तिकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचं अमोल यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली.

आदित्य ठाकरे भारत जोडोमध्ये पोहोचताच कीर्तिकर एकनाथ शिंदेंसोबत
शिवसेना पक्षात फुट पडल्यापासून गजानन कीर्तिकर वारंवार त्यांची भूमिका मांडत होते. आपण राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत आघाडीत न राहता स्वंतत्र राहू, असा विचार ते मांडत होते. आज आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या भारत जोडोत लोकशाही आणि संविधानाच्या बचावासाठी दाखल झाल्याचं सांगण्यात आलं. नेमक्या त्याच दिवशी गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

गजानन कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा अंदाजे १,८३,००० मतांच्या फरकाने पराभव केला. ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button