ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘जरा याद करो कुर्बानी’ कार्यक्रमातून शहीदांचे स्मरण

पोलीस सारथी संस्थेच्या वतीने आयोजन

पिंपरी : २६/११ रोजी मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ जरा याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस सारथी संस्थेच्या वतीने चिंचवड येथील कार्यालयात याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी शहिदांच्या आठवणींना उजाळा दिला. पोलीस सारथी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी अंकुश भोसले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.

या वेळी आयोजित कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळूंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी अजय जोगदंड, जगदीश ढोले आदी प्रमुख उपस्थित होते.

तसेच पोलीस सारथी संस्थेचे शुभम ससे, सुरज पांढरे, दीपक परदेशी, केदार गाडे, संजय वणगे, सतीश थोपटे, राहुल आंबवले, अतुल काटे, महेश गहिरवार, गणेश सोनटक्के, महेश दरेकर, मुकेश बाफना, आनंद खंडागळे, अरिफ नदाफ, प्रज्वल सोनवणे, वैभव बारणे, अनुराग पाटील, नितीन गावडे, आदित्य कुलकर्णी, विपुल गुडेकर, गणेश ठाकूर, कविता जगताप, रंजना धारसे, विद्या शिंदे, धनश्री जाधव, ज्योत्स्ना दरेकर आदी या वेळी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून भोसले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. मुंबई मध्ये झालेल्या या हल्ल्यात अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना वीर मरण आले. या विरोधात संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. या अधिकाऱ्यांचे स्मरण रहावे यासाठी पोलिस सारथी संस्था कार्यक्रम आयोजित करत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button