breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पुढाकाराने मणदूर गावात पशुखाद्य वाटप; शेतकऱ्यांमध्ये समाधान

शिराळा । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शिराळा तालुक्यातील मणदूर गावामध्ये शेतकरी हतबल झाला आहे. या गावातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. मदत कार्य म्हणून गावातील शेतकऱ्यांना १०० बॅग पशुखाद्य वाटप करण्यात येणार आहे. कारण, गाव सील असल्यामुळे शेतात जावून गुरांसाठी चारा- खाद्य उपलब्ध करणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे.

शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील मणदूर हे गाव गेल्या कित्येक दिवसापासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने त्रस्त आहे. हे गाव पूर्णपणे प्रशासनाकडून सील असलेने येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. शेतकऱ्यांना घरातून बाहेर पडून शेतात जाणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे शेती तसेच जनावरांचे हाल होताहेत.त्यामुळे सन्माननीय आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) आणि युवा नेते मा.विराज नाईक (दादा)यांनी “विराज कॅटल फिड्स” मधून मणदूर गावातील जनावरांचे साठी १०० बॅग पशुखाद्य पुरवठा करणेचा निर्णय घेतला,आणि आज पशुखाद्याची गाडी विराज इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयाकडे सुपूर्द करणेत आली.

शेतकऱ्यांच्या प्रति असलेली सहानुभूती यामुळे आमदार मानसिंगराव नाईक व युवा नेते विराज यांचेंबद्दल शेतकऱ्यांचे कडून समाधान व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button