breaking-newsक्रिडापिंपरी / चिंचवड

PCMC: अल्टिमेट, रुद्रा मार्शल, नि:युद्ध कराटेच्या खेळाडुची बाजी

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन : जिल्हास्तरीय किक बॉक्सिंगसाठी 1 हजार 277 खेळाडुंचा सहभाग

पिंपरी: जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेतील विविध गटातील अल्टिमेट मार्शल आर्ट्स, रुद्रा मार्शल, आणि नि:युद्ध कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भोसरी गावठाण येथील महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदार संघात १०८ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लांडगे व नि:युद्ध कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बोईनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 27 संघांनी भाग घेतला. उरुळी कांचन, कात्रज, पिंपरी, चिंचवड, आळंदी, चाकण, नाशिक, निघोजे, हडपसर, दिघी, मोशी, इंद्रायणीनगर, भोसरी इत्यादी ठिकाणाहून 1 हजार 277 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…

सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनियर गटात पार पडल्या. सब ज्युनिअर कॅटेगरी मध्ये अल्टिमेट मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर ज्युनिअर कॅटेगरी मध्ये रुद्रा मार्शलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सीनियर कॅटेगरीमध्ये नि:युद्ध कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रँड मास्टर किसन शिंदे यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रविंद्र लबडे, सचिन आंबेकर, संदीप जाधव, अमोल जगताप, दीपक ठाकूर यांनी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button