Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

आज पालघर, नाशिक, रायगड, पुणे, जिल्ह्यांना रेड अलर्ट

पालघर : महाराष्ट्रात पावसानं पुन्हा एकदा जोर लावला आहे. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसानं राज्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागानं विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी केले आहेत. हवामान विभागाच्या अलर्टनुसार आज पालघर, नाशिक, रायगड, पुणे, जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पालघरमधील वसईत दरड कोसळल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. याघटनेत चार जणांना वाचवण्यात आलं असून दरडीखाली असलेल्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसाळ यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.पालघर जिल्ह्यातील वसई भागात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं घरांचं नुकसान झालं असून अनके जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. माणिक गुरसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४ जणांचा वाचवण्यात आलं आहे. बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासदंर्भातील वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. पालघर जिल्ह्यातील वसईतील राजवली वाघरल पाडा येथे दरड कोसळली आहे. या घटनेत ६ जण दरडीखाली दबले होते. सहा पैकी दोघे जण दरडीखाली अडकले आहेत. पोलीस आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अजून दोघे जण दरडीखाली अडकल्याची माहिती आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टेकाळेजवळ दरड कोसळली आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

शहापूरमध्ये चोघेजण वाहून गेले
पालघरमधील शहापूरमध्ये पुराच्या पाण्यात चार जण वाहून गेल्याची घटना घडली. त्या चार जणांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.


राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग

महाराष्ट्रात जुलै पहिल्या आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. येत्या सहा दिवसांमध्ये समुद्राला उधाण येणार असल्यानं राज्य आपत्ती विभागानं अलर्ट जारी केले आहेत. १३ ते १७ जुलैपर्यंत ४ ते ५ मीटर उंचीच्या लाटा समुद्रकिनारी उसळणार असल्यानं नागरिकांनी समुद्राच्या किनारपट्टी भागात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागानं पालघर, नाशिक, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button