breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमनोरंजन
‘कराटे किंग’ जॅकी चॅनलाही करोना विषाणूची लागण
करोना वायरसने चीनमध्ये अक्षरश: थैमान घातला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत दोन हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आणि आता तर हा वायरस जवळपास ५० देशांमध्ये पसरला आहे. या करोना विषाणूने अगदी सुपरस्टार जॅकी चॅनला देखील सोडलं नाही. ‘कराटे किंग’ जॅकी चॅनला तडकाफडकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
चीनी वृत्तमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जॅकीला संशयीत रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याला करोना विषाणूची लागण झाल्याची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. सध्या त्याच्यावर वैद्यकिय तपासणी सुरु आहे.
मात्र लाडक्या अभिनेत्याला करोना विषाणूची लागण झाली नसावीच अशी अपेक्षा चाहत्यांनी केली आहे.