breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

RBIची तीन दिवस मॅरेथॉन बैठक, EMIपासून व्याजदरापर्यंत मोठं गिफ्ट देण्याची तयारी

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बँके(RBI)ची आर्थिक धोरण आढावा बैठक आता 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला होणार आहे. आरबीआयनं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करत द्वैमासिक आर्थिक धोरण आढावा बैठक 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

बैठकीच्या शेवटच्या दिवशी 9 ऑक्टोबरला आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करतील. या निर्णयांत EMIपासून व्याजदरापर्यंत मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 3 सदस्यांची नियुक्ती झाली आहे. सरकारनं सोमवारी तीन प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञांना आरबीआयच्या रेट सेटिंग मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या सदस्यांच्या स्वरूपात नियुक्त केले आहे. यात PMEAC सदस्य अशीमा गोयल, नॅशनल काऊन्सिल फॉर अप्लाइड इकोनॉमिक रिसर्चचे सीनिअर ऍडव्हायजर शशांक भिडे आणि IIM अहमदाबादचे प्रोफेसर जयंत आर वर्मा हे नवे सदस्य तयार झाले आहेत.

वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळानं नियुक्ती समिती(एसीसी)च्या या नावांना मंजुरी दिली.

RBI अधिनियमानुसार, तीन नव्या सदस्यांची नियुक्ती 4 वर्षांसाठी होणार आहे. पहिल्या मॉनिटरी पॉलिसीची बैठक 29, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला होणार होती. परंतु आरबीआयनं एमपीसीची मागची बैठक रद्द केली होती. त्यामुळे स्वतंत्र सदस्यांची नियुक्ती उशिरानं झाली. एमपीसीची बैठक पुन्हा घेतली जाऊ शकते, असं आरबीआयनं तेव्हा सांगितलं होतं. त्यात चेतन घाटे, पामी दुआ आणि रवींद्र ढोलकियासुद्धा होते. चेतन घाटे भारतीय सांख्यिकीय संस्थानमध्ये प्रोफेसर होते.

पामी दुआ दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स(DSE)मध्ये संचालक होते. तर रवींद्र ढोलकिया हे अहमदाबादमधल्या भारतीय प्रबंधन संस्थानमध्ये प्रोफेसर होते. आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील पॅनलचा अर्धा भाग बाहेरील स्वतंत्र सदस्य बनले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button