breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना महिला आघाडीकडून योगी सरकारला चोळी-बांगड्याचा आहेर

अहमदनगर | हाथरस घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेश मधील योगी सरकारला चोळी आणि बांगड्यांचा आहेर पाठविण्यात आला आहे. यामधून शिवसेनेने एक प्रकारे भाजपवर निशाणाच साधला आहे. शिवसेना महिला आघाडीने कोपरगाव तहसीलदार यांच्याकडे हा आहेर सुपूर्द केला असून त्यांनी यावेळी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

‘उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला, मात्र या प्रकरणावर भाजपाचे फडणवीस असतील अभिनेत्री कंगना असेल किंवा स्मृती इराणी असेल… यापैकी कोणीही बोलताना दिसत नाही. इतर वेळी अन्य सरकारला बांगड्या भरणाऱ्या स्मृती इराणी आज गप्प का? त्यामुळे आता आम्हीच योगी सरकारला चोळी आणी बांगड्याचा आहेर दिला आहे.’ अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सपना मोरे यांनी दिली आहे.

‘आपल्या स्वःतच्या बहिणीला कोणी हिणवलं तर आपल्याला चीड येते. मात्र भाजपा आमदार मुलींवर संस्काराची भाषा करतात. त्या पीडितेच्या जागी कदाचित आपली बहीण असली असती तर?’ असा सवाल विचारत शिवसेनेच्या रणरागिणींनी आपला संताप व्यक्त केला. हाथरस मधील नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी करत कोपरगाव तहसील कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.दरम्यान, उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर त्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण देशभर या घटनेचा निषेध नोंदवला जात असून संबधित आरोपींनां फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button