पिंपरी / चिंचवड

चिंचवड येथे भर दिवसा महिलेवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

पोलीस आयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाने महिलेवर भर दिवसा बलात्कार केला. हा प्रकार 16 मे रोजी दुपारी सव्वादोन वाजता घडला.

सरोज देविराम बिस्टा (वय 28, रा. चिंचवड, मूळ रा. नेपाळ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 29) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 16 मे रोजी दुपारी जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी रस्त्याने चालत जात होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना हाक मारली आणि त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन महिलेवर बलात्कार केला.

याप्रकरणी पीडित महिलेने दोन आठवड्यानंतर फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर घडला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button