पिंपरी / चिंचवड

रहाटणी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

पिंपरी l प्रतिनिधी

कोकणे चौक रहाटणी येथे एका अल्पवयीन मुलीवर अनोळखी व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

ही घटना फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने 14 एप्रिल रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी घरात एकटी असताना अनोळखी व्यक्ती पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आला. त्याने पीडित मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. ‘तू जर आवाज केलास तर तुला मारून टाकीन’ अशी आरोपीने धमकी दिली. दरम्यान मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button