पिंपरी / चिंचवड

भावाच्या पत्नीचा विनयभंग : दिरावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

घरात चौकट करत असताना झालेल्या वादातून दिराने भावाच्या पत्नीचा विनयभंग केला. याप्रकरणी दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना 3 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता निघोजे ता. खेड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीला घराच्या समझोता करारानुसार वाटून आलेल्या खोलीला फिर्यादी यांचे पती चौकट करत होते. त्यावेळी आरोपी दिराने फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीसोबत वाद घातला. दरम्यान कामगार निघून जातील म्हणून पती घराबाहेर गेले असता दिराने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button