पिंपरी / चिंचवड

तळेगाव, निगडी, चिखली येथे चोरीच्या चार घटना : तीन लाख 10 हजारांचा ऐवज चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

चिखली येथून रिक्षा, तळेगाव दाभाडे मधून दुचाकी चोरीला गेली आहे. तर निगडी मधून पीएमपीएमएल बस स्थानकावरून महिलेचे दागिने चोरीला गेले आहेत. चिखलात चोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला. रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पोतून तीन फ्रीज चोरीला गेले आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 14) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रमोद हरिश्चंद्र पोरनाक (वय 26, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून त्यांचा 75 हजारांचा रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री साडेआठ ते गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेसात या कालावधीत घडली.

जितीन विजय कदम (वय 25, रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 80 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी दहा ते दुपारी चार वाजताच्या कालावधीत घडली.

निगडी येथील पीएमपीएमएल बस स्थानकावर एका महिलेच्या गळ्यातील 80 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी (दि. 13) सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कमलाकर अंगत इंगळे (वय 29, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो स्पाईन रोडवर त्यांचा टेम्पो पार्क केला होता. टेम्पोच्या मागील दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी टेम्पोतून सॅमसंग कंपनीचे तीन फ्रीज चोरून नेले. ही घटना 28 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button