breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही’; रणजीत सावरकर यांचा मोठा दावा

नवी दिल्ली | स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी ‘Make Sure Gandhi is Dead’ हे पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन झालं. या पुस्तकात त्यांनी एक दावा केला आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये नथुराम गोडसेंच्या गोळीने महत्वा गांधींची हत्या झालीच नाही असं म्हटलं आहे.

‘Make Sure Gandhi is Dead’ या पुस्तकात रणजीत सावरकर यांनी हा दावा केला आहे की, महात्मा गांधी यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या आणि नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. महात्मा गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नथुराम गोडसेच्या बंदुकीतून ज्या गोळ्या चालवण्यात आल्या त्याने महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. तसंच गांधींच्या हत्येमागे कोण आहेत हे शोधण्याचं आवाहनही रणजीत सावरकर यांनी केलं आहे. या पुस्तकामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही. महात्मा गांधी यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. ज्या गोळीने महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलेली नव्हती असा मोठा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.

हेही वाचा   –    निमगाव चोभा येथे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार; ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप 

पुस्तकात रणजीत सावरकर यांचा दावा काय?

नथुराम गोडसे फक्त RSS चे स्वयंसेवक होता. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेवर बंदी घालण्यात आली होती. हे राम चं नाव घेऊन मोठं पाप दाबून ठेवण्यात आलं होतं. ते या पुस्तकातून समोर येईल असाही दावा दिल्लीत रणजीत सावरकर यांनी केला. नथुरामांच्या गोळ्यांनी गांधीचा मृत्यू झाला नाही. कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. नथुराम गोडसेचा समज झाला की मीच गोळ्या मारल्या पण खऱ्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे २०० लोक होते. तिथे सुरक्षा व्यवस्था होती.

नथुराम गोडसे गुन्हेगार नव्हता. तो पत्रकार होते. त्यामुळे त्याचा निशाणा लागणे शक्य नव्हते. हे सगळे पुरावे पाहता गोडसेने महात्मा गांधींना मारले नाही. गांधीजी दुसऱ्यांच्या गोळ्यांनी मेले. ते कोण होते ते तपासायला हवे. यानंतर वल्लभभाई पटेल यांचा गट संपवण्यात आला. त्यानंतर आपण ग्रेट ब्रिटन सोबत व्यापार सुरू केला. १९७१ मध्ये हंटर विमान वापरले. पंडित नेहरूंना आणि ब्रिटनला याचा फायदा झाला. माझं आवाहन आहे, सरकारनं यावर एक आयोग नेमावा. गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले होते. त्यावर चौकशी सुरू करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button